Police : श्रीरामपूर: शहरात आज (ता.४) पोलिसांनी (Police) गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) व ईद (Eid) सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन केले. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी (Crime) घटनांची मालिकाच सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर; २०१८च्या प्रभाग रचनेत अंशतः बदल
सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण
शहराच्या मध्यवर्ती भागात भरदुपारी झालेली गोळीबाराची घटना असेल किंवा माजी नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर गावठी कट्टाधारी तरुणांकडून झालेली रेकी असेल या घटनांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार हेमंत ओगले यांनीही बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर पोलिसांना खडेबोल सुनावले होते.
अवश्य वाचा : मोहटा येथील शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
गणेश विसर्जन तसेच ईद मिरवणूक मार्गावर पथसंचालन (Police)
त्यानंतर पोलिसांनीही अवैध धंदे व गुन्हेगारीवर कारवाईचे सत्र सुरू केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी गणेश विसर्जन तसेच ईद मिरवणूक मार्गावर पथसंचालन केले. या पथसंचलनात ७ पोलीस अधिकारी, ३० पोलीस अंमलदार, आरसीपी तसेच एसआरपी पथक, ४० होमगार्ड यांचा सहभाग होता.