Police : पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी; तरुणाकडे आढळला परवानाधारक पिस्तुल, २६ जिवंत काडतुसे

Police : पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी; तरुणाकडे आढळला परवानाधारक पिस्तुल, २६ जिवंत काडतुसे

0
Police : पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी; तरुणाकडे आढळला परवानाधारक पिस्तुल, २६ जिवंत काडतुसे
Police : पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी; तरुणाकडे आढळला परवानाधारक पिस्तुल, २६ जिवंत काडतुसे

Police : नगर : अहिल्यानगर शहरात महापालिकेची (Ahilyanagar Municipal Corporation) आचारसंहिता लागू असून शहर पोलिसांकडून (Police) ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. त्यानुसार शहरातील डीएसपी चौकात तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) नेवासा येथील एका तरुणाला मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक परवानाधारक पिस्तुल व २६ जिवंत काडतुसे मिळून आले आहेत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी

पाठलाग वाहन अडवले

शरद हरीदास दरंदले (वय ४१), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार भानुदास खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सहायक निरीक्षक गणेश वारूळे, उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार खेडकर, सुजय हिवाळे यांचे पथक डीएसपी चौकात रात्री नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना संशयित कारने पोलिसांना हुलकावणी देत वेगाने पळ काढला. पोलिसांनी या कारचा पाठलाग करून कोठला बसस्थानक परिसरात वाहन अडवले.

नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री

२६ काडतुसे आणि शस्त्र ताब्यात (Police)

चालक शरद हरीदास दरंदले हा मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक परवानाधारक ७.६५ एम.एम. पिस्तुल आणि मॅक्झिनमध्ये ८ जिवंत काडतुसे आढळली. वाहनाच्या अधिक झडतीमध्ये एका बॉक्समध्ये १८ अतिरिक्त जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी एकूण २६ काडतुसे आणि शस्त्र ताब्यात घेतले.