Poilce | एसटी कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्याने केली मारहाण; राहाता बसस्थानकातील घटना

0

Police | राहाता : एसटी कर्मचाऱ्याला प्रवाशांकडून वाद अथवा मारहाण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांविरोधात पोलीस (Police) ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे गुन्हे दाखल होतात. मात्र, एखाद्या पोलिसानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने एसटी बसच्या चालक व वाहकाला मारहाण केली तर? अशी घटना अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील राहाता (Rahata) शहरात घडली आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

लाथा बुक्क्यांनी मारहाण (Police)

राहाता बसस्थानकात एसटी बस घेऊन येणार्‍या बस चालक व वाहक यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्या येवला पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल व त्यांच्या बरोबर असलेल्या तीन व्यक्ती विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेचे रक्षक समजले जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशी वर्तणूक केल्यामुळे पोलीस खात्याचे नाव बदनाम होत असण्याची चर्चा पोलीस व नागरिकांमध्ये दिसून आली.

नक्की पहा : कोपरगावात युवकाचा दगडाने ठेचून खून

गणवेशाचा खिसा फाडला (Police)

याबाबत राहाता पोलीस ठाण्यात बस कंडक्टर बालाजी पंडितराव बोरगावकर व चालक विकास बालाजी मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रविवारी एक मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान राहाता बसस्थानकात एसटी बस घेऊन येणारे चालक विकास मुंढे व कंडक्टर बालाजी बोरगावकर यांना सध्या येवला पोलीस ठाणे येथे नेमणुकीला असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व सार्थक संजय बनसोडे व त्यांच्याबरोबर असलेल्या दोन व्यक्तींनी एसटी बस चालक व कंडक्टर यांना शिवीगाळ दमबाजी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बस चालक विकास मुंढे यांच्या सरकारी गणवेशाचा खिसा फाडला.

हे वाचा – पाकिस्तानला आणखी एक धक्का; रद्द होणार बांगलादेश मालिका, कारण काय?

गुन्हा दाखल (Police)

मारहाणीत त्यांना मार लागलेला आहे. तसेच पोलिसांना देखील दमबाजी करून मी पोलीस आहे. तुमच्यावर तसेच पोलीस उपनिरीक्षक लेंडे व पोलीस ठाणे अंमलदार बर्डे यांना तुम्हाला सर्वांना कामाला लावून टाकेल व तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. फिर्यादी हे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व त्यांच्याबरोबर असलेल्या तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here