Police Administration : पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर १० हजार ३३१ अभिप्राय

Police Administration

0
Police Administration
Police Administration

Police Administration : नगर : जिल्हा पोलिसांनी नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या (Police Administration) कार्यपध्दतीबाबत थेट अभिप्राय नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर तब्बल १० हजार ३३१ नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. वाहतूक कोंडी, सायबर गुन्हे (Cyber ​​Crime), महिला सुरक्षितता तसेच अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत नागरिकांनी ठोस प्रतिक्रिया नोंदवत पोलिसांकडून प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन कामांना प्राधान्यक्रम दिला जाईल. ज्या पोलीस ठाण्यांचे गुणांकन कमी आले आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी सांगितले.

नक्की वाचा :  जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?  

मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलीस दलाने नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी विशेष जनमत सर्वेक्षण मोहिम ३० जून ते ९ जुलै या कालावधीत राबविली. यामध्ये क्यूआर कोड व ऑनलाइन लिंकव्दारे नागरिकांना सहभागी करून त्यांचे मत, सूचना व अभिप्राय मूल्यांकन गोळा करण्यात आले. या मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील १० हजार ३३१ नागरिकांनी अभिप्राय नोंदविले आहेत. यामध्ये सर्वाधिक अभिप्राय राहुरी पोलीस ठाणे ६७१ हद्दीतून तर सर्वात कमी अभिप्राय राजूर पोलीस ठाणे ९० नागरिक हद्दीतून नोंदविले गेले. सायबर गुन्ह्यासंदर्भात १ हजार ८७५ नागरिकांचे अभिप्राय आले. वाहतुकीची समस्या बाबत १ हजार ९९१ नागरिकांचे अभिप्राय नोंदविले. तसेच महिला सुरक्षेबाबत १ हजार ९९८ अभिप्राय नोंदविण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

पोलीस ठाणे निहाय अभिप्राय (Police Administration)

राहुरी -६७१, नगर तालुका -६५०, एमआयडीसी – ५४५, पाथर्डी – ५३२, कोतवाली- ५१७, नेवासा – ४६३, तोफखाना -४६३, पारनेर- ४३५, श्रीरामपूर शहर – ४१०, शेवगाव -३९३, भिंगार कॅम्प – ३४८, कर्जत- ३४२, लोणी – ३२६, शिर्डी – ३२३, जामखेड – २९८, श्रीगोंदा – २८१, कोपरगाव ग्रामीण – २७१, श्रीरामपूर ग्रामीण – २६७, कोपरगाव शहर – २६१, मिरजगाव – २५३, बेलवंडी – २४९, खर्डा – २३४, शनिशिंगणापूर – २२६, सोनई – २१३, अकोले – २१२, संगमनेर शहर – २०६, घारगाव- १८८, आश्वी- १८२, संगमनेर ग्रामीण- १८१, राहाता – १७०, सुपा – १३१, राजूर – ९०,
असे एकूण १० हजार ३३१ अभिप्राय नोंदविण्यात आले आहेत.