Police Assault : सरकारी कामात अडथळा; चौघांना सहा महिन्यांची शिक्षा

Police Assault : सरकारी कामात अडथळा; चौघांना सहा महिन्यांची शिक्षा

0
Police Assault : सरकारी कामात अडथळा; चौघांना सहा महिन्यांची शिक्षा
Police Assault : सरकारी कामात अडथळा; चौघांना सहा महिन्यांची शिक्षा

Police Assault : नगर : सरकारी कामात अडथळा (Obstruction in Government Work) निर्माण करून पोलिसांवर मारहाण (Police Assault) केल्याप्रकरणी चौघा आरोपींना न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी हा निकाल दिला आहे.

नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण

६ महिन्यांचा कारावास व प्रत्येकी १ हजारांचा दंड

या प्रकरणातील आरोपी श्रीकांत सुभाष लहासे (वय २६), रवींद्र बाळासाहेब धायतडक (वय २२), भाऊसाहेब बाबासाहेब धायतडक (वय ३०) व सचिन हरीश्चंद्र शेळके (वय २७) यांना प्रत्येकी सहा महिन्यांचा साधा कारावास व प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिन्यांची अतिरिक्त कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

याबाबत हकीकत अशी, (Police Assault)

२० मार्च २०१७ रोजी शेवगाव येथील रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान विषयाच्या बोर्ड परीक्षेदरम्यान पोलीस बंदोबस्तासाठी फिर्यादी सुधीर दत्ता खाडे हे ड्युटीवर होते. त्यावेळी आरोपी श्रीकांत लहासे हा शाळेच्या मागील बाजूने विद्यार्थ्यांना कॉफी देण्यासाठी आला होता. फिर्यादीने त्याला तेथून जाण्यास सांगितल्यावर त्याने वाद घालत आरडाओरडा केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने इतर साथीदारांना बोलावून घेतले.

त्यानंतर आरोपी रवींद्र धायतडक, भाऊसाहेब धायतडक, सचिन शेळके व इतर काही अनोळखी व्यक्तींनी एकत्र येत पोलिसांवर लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पाइप, दांडके व पट्ट्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीस मदत करण्यासाठी आलेल्या पोलीस हवालदारालाही मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. फिर्यादी सुधीर खाडे, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक जी. बी. ओमासे व पोलीस उपनिरीक्षक शेख यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणी सरकारी बाजू अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अनंत बा. चौधरी यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक बेळगे व महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना पोटे यांनी सहकार्य केले.