Police Custody : ‘त्या’ शिक्षण संस्थेचा अध्यक्ष जेरबंद; दोन दिवसाची पोलीस कोठडी

Police Custody : 'त्या' शिक्षण संस्थेचा अध्यक्ष जेरबंद; दोन दिवसाची पोलीस कोठडी

0
Police Custody : 'त्या' शिक्षण संस्थेचा अध्यक्ष जेरबंद; दोन दिवसाची पोलीस कोठडी
Police Custody : 'त्या' शिक्षण संस्थेचा अध्यक्ष जेरबंद; दोन दिवसाची पोलीस कोठडी

Police Custody : नगर : केंद्र शासनाकडून (Central Government) आश्रमशाळेसाठी मिळालेल्या तब्बल २ कोटी ४८ लाख रूपयांच्या अनुदानात अपहार केल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) सद्‌गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे (वय ५८) व विश्वस्त संजय बन्सी साळवे (वय ५६, दोघे रा, आलमगीर रस्ता, भिंगार) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजार केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल

यांच्याविरूध्द गुन्हा दाखल

सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील सहायक लेखाधिकारी संदीप हरीभाऊ देठे (वय ४६) यांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून साळवे बंधूसह उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे, सचिव अनिल तुळशीदास शिंदे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, विश्वस्त राजू बन्सी साळवे आणि रेखा संजय साळवे (सर्व रा. भिंगार, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप

२ कोटी ४८ लाखांच्या निधीचा अपहार (Police Custody)

सद्‌गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेने २०१५ ते २०२० या कालावधीत केंद्र शासनाकडून केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेसाठी अनुदान मिळवले होते. शासनाने संस्थेच्या खात्यावर २ कोटी ४८ लाख २१ हजार ४२४ रूपये जमा केले. नियमानुसार हा निधी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि शाळेच्या भौतिक सुविधांवर खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून या निधीचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.