Maharashtra Police : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तारीख जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पोलिसांना बंदोबस्ताची ड्युटी (Police Duty)असेल. निवडणूक काळात राज्यातील सर्वच पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांना १५ ते २५ नोव्हेंबर या काळात सुट्ट्या व रजा (Holidays & Leave) मिळणार नाहीत,असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने काढले आहेत.
नक्की वाचा : राज्यात आज पुन्हा जोरदार पावसाच्या सरी!’या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
मतदानामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त (Maharashtra Police )
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मंगळवारपासून (ता.२२) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होईल. त्यासाठीही पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. ५ ते १८ नोव्हेंबर या काळात प्रचारसभा, कॉर्नर बैठका होतील. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होईल. त्यामुळे ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदारसंघात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
अवश्य वाचा : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू
पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, राज्य राखीव पोलीस बल (Maharashtra Police)
पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, राज्य राखीव पोलिस बलाचेही कर्मचारी असणार आहेत. राज्यातील जवळपास दीड लाख पोलिस, ४७ हजार होमगार्ड व राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्यांनाही विविध ठिकाणी बंदोबस्त दिला जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलिसांचा ज्यादा बंदोबस्त असणार असून काही ठिकाणी नावप्रविष्ट पोलिसांनाही बंदोबस्ताची ड्युटी दिली जाणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून सुरू आहे.