Police Parade : कर्जत : कर्जत शहरात स्थानिक पोलीस यांच्यासह सीआरपीएफ (CRPF) आणि रॅपीड अॅक्शन फोर्स (Rapid Action Force) यांचे संयुक्त पथसंचलन शुक्रवारी (ता.६) सकाळी पार पडले. कर्जत पोलीस स्थानकातून निघालेला रूट मार्च (Police Parade) रथमार्गावरून बसस्थानक परिसरात नेण्यात आला. पोलीस वाहनांच्या सायरनने शहर दणाणून सोडले होते. पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी विशाल बिन्नर आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे यात सहभागी झाले होते.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर
संवेदनशील ठिकाणी भौगोलिक परिस्थितीची पाहणी
कर्जत शहरातील संवेदनशील ठिकाणी यासह शहराची भौगोलिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सीआरपीएफ आणि अॅक्शन फोर्सचे एसीपी विशाल बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहकारी अधिकारी यासह ३७ जवानांसोबत पथसंचलन पार पडले. शुक्रवारी सकाळी १० वाजता कर्जत पोलीस ठाण्याच्या आवारात सदरच्या पथसंचलनास सुरुवात झाली.
हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या
अचानक निघालेल्या रूटमार्चने नागरिक अवाक (Police Parade)
हा रूटमार्च दादा पाटील महाविद्यालय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, म्हसोबा गेट, कापरेवाडी वेस, आलमगीर मज्जिद, काकडे हॉस्पिटल, बाजारतळ, मेन रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानकातून नेण्यात आला. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गृहविभागासह पोलीस प्रशासन सतर्क असून सर्वसामान्य नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणी कायदा-सुव्यवस्था हातात घेणार नाही याबाबत आवाहन करण्यात आले. अचानक पोलीस वाहनांचे सायरन वाजवत निघालेल्या रूटमार्चने नागरिक अवाक झाले होते.



