Police Patil : नगर : राज्यातील पोलीस पाटलांच्या (Police Patil) मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत (Cabinet meeting) हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधन वाढीचा (Salary increase) निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून हे मानधन १५ हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : अहमदनगरचं नामांतर आता ‘अहिल्यानगर’ हाेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाने यासाठी लढा सुरू केला होता. राज्यभरात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याची ग्वाही पोलीस पाटलांना दिली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस पाटलांचे मानधन ६ हजार ५०० रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यास सहमती दर्शवली.
हे देखील वाचा : काँग्रेसच्या विनायक देशमुखांचा भाजपत प्रवेश
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानधन वाढीचा निर्णय (Police Patil)
त्यानुसार बुधवार, (ता. १३) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस पाटलांच्या मानधनात ८ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली. आता पोलीस पाटलांना १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे.