
Police Raid on Slaughterhouse : नगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouse) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) शुक्रवारी (ता. १३) धाड टाकून (Police Raid on Slaughterhouse) तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ हजार १०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी शस्त्रे तसेच रोख रक्कम असा सुमारे तीन लाख ३३ हजार ४३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करत असल्याची माहीती
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, अतुल लोटके आणि सागर ससाणे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदनगर परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे आणून त्यांची अवैध कत्तल करत आहे. याबाबत माहिती घेत असताना माहिती मिळाली की, सोफीयान कुरेशी हा त्याच्या साथीदारांसह हुसेनमियाँ मशिदीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करत असल्याची माहीती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये तीन इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
भिंगार कॅम्प ठाण्यात गुन्हा दाखल (Police Raid on Slaughterhouse)
शेडमधील गोवंशीय जनावरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत केली असता अस्तफाक अल्लाउद्दीन कुरेशी (वय ३८, रा. घास गल्ली कोठला), मुदस्सर कदीर कुरेशी (वय ४०, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट), शकील बाबासाहेब कुरेशी (वय ४०, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट) अशी संशतयीत आराेपींची नावे आहेत. चौकशीत हा कत्तलखाना सोफीयान वहाब कुरेशी (रा. झेंडीगेट) चालवत असल्याचे तसेच हा कत्तलखाना चालवण्यासाठी मुकुंदनगर येथील वसीम तवेरा याने जागा भाड्याने दिल्याचेही निष्पन्न झाले आहे. हे दोघेही पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


