Police Recruitment : नगर : जिल्ह्याच्या पोलीस (Police) प्रशासनासाठी ६४ जागांची पोलीस भरती (Police Recruitment) प्रक्रिया निघाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत बुधवार (ता. १९) ते २९ जून या कालवधीत नगरच्या पोलीस मुख्यालय व अरणगाव- वाळुंज बाह्यवळण रस्त्यावर मैदानी चाचणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) राकेश ओला यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली.
अवश्य वाचा : विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू
शिपाई पदासाठी २५ तर वाहनचालक पदासाठी ३९ जागा
जिल्ह्यातील ६४ जागांपैकी पोलीस शिपाई पदासाठी २५ तर वाहनचालक पदासाठी ३९ जागा आहेत. पोलीस शिपाई या पदासाठी एक हजार ९४७ तर चालक पदासाठी तीन हजार ९०९ उमेदवार असे पाच हजार ८५६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एकाच वेळी दोन जिल्ह्यांमध्ये परीक्षेचे अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी विनंती अर्ज करून मुदत वाढविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही अर्ज हे वेगवेगळ्या पदांसाठी असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू
पावसामुळे व्यत्यय आल्यास पुढील योग्य ती तारीख (Police Recruitment)
भरती प्रक्रियेच्या वेळी सर्वप्रथम उमेदवारांची प्राथमिक कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणी वेळी पावसामुळे व्यत्यय आल्यास अगर मैदानी चाचणी होऊ न शकल्यास उमेदवारांना पुढील योग्य ती तारीख देण्यात येईल. मैदानी चाचणीची पहिली तारीख व दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसांचे अंतर ठेऊन पुढील तारीख देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी उमेदवारांनी पहिल्या मैदानी चाचणीला हजर होता त्याचे लेखी पुरावा दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
या भरती प्रक्रियेत उमेदवारांना अरणगाव बाह्यवळण पासून वाळुंज बाह्यवळणपर्यंत १६०० मीटर अंतर धावावे लागणार आहे. त्यामुळे १९ ते २९ जून या कालावधीत दररोज सकाळी ६ ते दुपारी २ या कालावधीत अरणगाव ते वाळुंज बाह्यवळणकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्या ऐवजी सर्व वाहतूक त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे वाळुंज बाह्यवळण पासून अरणगाव बाह्यवळण मार्गे ये-जा चालेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे.