Police Transfer : नगर : राज्य शासनाच्या (State Government) गृह विभागाने उपविभागीय अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगर शहर, शिर्डी, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी सहा पोलीस निरीक्षकांसह ९८ अमंलदारच्या बदल्याचे (Police Transfer) आदेश काढले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खांदेपालट झाली, असून एकच चर्चा सुरू आहे.
नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर
या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची होणार बदली
अहिल्यानगर शहराचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांची शिर्डी येथे बदली करण्यात आली आहे. शिर्डीचे उपअधीक्षक शिरीष वामने यांची बदली रिक्त असलेल्या अहिल्यानगर ग्रामीणच्या उपअधीक्षकपदी करण्यात आली आहे. श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक बसवराज शिवपूजे यांची बदली मंगळवेढा (जि. सोलापूर) विभागाच्या उपअधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमरावती शहर येथील सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भावर यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत चे आदेश गृह विभागाने काढले आहेत.
अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!
जिल्ह्यांतर्गत बदल्या (Police Transfer)
तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नेवासा, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलेल आहेत. यामध्ये नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची जिल्हा विशेष शाखेत तर, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना दहशत विरोधी पथकाचे प्रभारी करण्यात आले असून तेथील निरीक्षक अरविंद जोंधळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांची शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील प्रवीण साळुंखे यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांसह विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ९८ पोलीस अंमलदारांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.