Politics : संगमनेरच्या राजकारणात नवा राजकीय पट मांडला जातोय?

Politics : संगमनेरच्या राजकारणात नवा राजकीय पट मांडला जातोय?

0
Politics : संगमनेरच्या राजकारणात नवा राजकीय पट मांडला जातोय?
Politics : संगमनेरच्या राजकारणात नवा राजकीय पट मांडला जातोय?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांच्या हालचालींना वेग

Politics : संगमनेर : संगमनेर (Sangamaner) हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण, सध्या राजकीय बदलांचे केंद्र बनले आहे. विविध पक्षीय हालचालींमुळे येथील राजकारणात (Politics) मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय (Party) समीकरणे, स्थानिक नेत्यांचे बदलते निर्णय, तसेच नव्या नेतृत्वाचा उदय या सर्वांचा एकत्रित परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

नक्की वाचा : लव्ह जिहाद, धर्मांतर व लँड जिहाद रोखण्यासाठी नाथ जागृती यात्रा : योगी बालकनाथ महाराज

संगमनेर अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला

संगमनेर विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विरोधकांनी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट ) या पक्षांनी स्थानिक पातळीवर सक्रियता वाढवली असून आता विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून येऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून एक हाती असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या टिकवण्यासाठी विरोधकांची धडपड सुरु असल्याचे पाहायला मिळते.

अवश्य वाचा : अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!

आगामी काळात मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता (Politics)

दरम्यान संगमनेरमधील काही नेते आपली भूमिकाही बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. जर एखाद्या नेत्याने आपली भूमिका बदलली तर भाजपच्या अंतर्गत असलेली धुसपूस संपून नाराज भाजपा आणि इतर नाराज गट हा त्या नेत्यांसोबत जाणार का? हे पाहण महत्वाचे ठरणार आहे. या तयारीमुळे आगामी काळात मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संगमनेरमधील लोकांमध्ये विकासाचे प्रश्न नेहमीच चर्चेत असतात. पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, तसेच स्थानिक पायाभूत सुविधा यांवर राजकारण केंद्रित असले तरी, पक्षीय गटातटात मात्र सत्ता टिकवण्याचा संघर्ष दिसून येतो.
राजकारणात सध्या तरुण नेतृत्व पुढे येत असल्याचे दिसते. नवे उमेदवार, तरुण संघटक आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेतृत्वामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हे तरुण नेते विकासाच्या मुद्द्यांवर भर देत असून, पारंपरिक राजकीय नेत्यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचेही दिसून येते.

संगमनेरच्या राजकारणात बदल होण्याच्या या शक्यतांना आगामी निवडणुकीत मतदारांची भूमिका ठरवणारी ठरेल. विकास, सत्तासंघर्ष आणि नेतृत्व यातील समतोल साधत मतदार आपला कौल कसा देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा बदल संगमनेरच्या लोकांसाठी फायद्याचा ठरेल की केवळ राजकीय गोंधळ वाढवणारा ठरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.