Polling Center : २९७ मतदान केंद्रांचे होणार वेब कास्टिंग; शहरात एकूण ३ लाख १३ हजार मतदार

Polling Center

0
Polling Center : २९७ मतदान केंद्रांचे होणार वेब कास्टिंग; शहरात एकूण ३ लाख १३ हजार मतदार
Polling Center : २९७ मतदान केंद्रांचे होणार वेब कास्टिंग; शहरात एकूण ३ लाख १३ हजार मतदार

Polling Center : नगर : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच (Ahmednagar City Assembly Constituency) ३ लाख १६ हजार ७९४ मतदार आहेत. २९७ मतदान केंद्र राहणार असून सर्व मतदान केंद्रांचे (Polling Center) वेब कास्टिंग केले जाणार आहे. या निवडणूका पारदर्शक वातारणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

नक्की वाचा : काश्मीरमधील बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती

तहसील कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

अवश्य वाचा : गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे अनोखे स्वागत

पाटील म्हणाले, (Polling Center)

शहरात एकूण ३ लाख १३ हजार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. शहरात ७५ टक्के मतदानाचे उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. मतदारसंघातील एकूण २ हजार १५१ मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आल्या. शहरात ८५ वर्षांवरील १२२ ज्येष्ठ नागरिक आणि १२ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला. शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.

शहरातील १०० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची तयारी झाली आहे. साहित्याचे वितरण आणि स्वीकृतीचे योग्यप्रकारे नियोजन केले असून कर्मचारी, साहित्य वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आचार संहितेच्या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सी-व्हिजील ॲपवर तक्रारी प्राप्त झाल्या असून तथ्य आढळलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली आहे. व्हॉट्सॲपवर चुकीचे संदेश अग्रेषित केल्या प्रकरणी मतदारसंघात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मतदान केंद्रावर केवळ पाच व्यक्तींना प्रवेश मतदान केंद्रासाठी ठरवून दिलेल्या मतदारांव्यतिरिक्त मतदान अधिकारी, प्रत्येक उमेदवार, त्याचा निवडणुक प्रतिनिधी व प्रत्येक उमेदवाराने नियुक्त केलेला एकावेळी एकच मतदान प्रतिनिधी, भारत निवडणूक किंवा आधाराशिवाय चालू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांबरोबर असलेली व्यक्ती, मतदारांची ओळख पटण्यासाठी किंवा मतदान करून घेण्याच्या कामी मतदान केंद्राध्यक्ष यांना अन्यप्रकारे सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष वेळोवेळी त्यांना प्रवेश देतील अशा व्यक्तीनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.


दिव्यांग व वयोवृद्धांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर ठेवण्यात येणार आहेत. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी सहकार्य करण्यात येईल.


शहरातील एकूण २९७ मतदान केंद्रांवर मतदान होत असून शहरातील सर्व बुधमध्ये वेबकास्टींग, पुरेसा सशस्त्र पोलिस बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कार्यवाही, सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.