Polling Station : मतदान केंद्रांवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाली चोरी

Polling Station : मतदान केंद्रांवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाली चोरी

0
Polling Station : मतदान केंद्रांवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाली चोरी
Polling Station : मतदान केंद्रांवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाली चोरी

Polling Station : नगर : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रावर (Polling Station) सुरक्षेच्या उद्देशाने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. केडगाव च्या शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.२६७, २६९, २७० तसेच माळीवाडा परिसरातील हिराबाई सुर्यवंशी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.२२१, २२२ या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.

नक्की वाचा : विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे अहिल्यानगरला स्वागत

प्रत्येक मतदान केंद्रावर बसविले होते कॅमेरे

निवडणूक काळात नगर शहर मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाने वेबकास्टिंग करण्यात आले होते. वेबकास्टिंगचे काम मॅनेजिंग डायरेक्टर, आय नेट सिक्युअर लॅब प्रा. लि. चेन्नई या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीमार्फत शहारामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करीता आतील व बाहेरील बाजु मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम महेश सुभाष गवळी (वय ३२, रा.पागीरे पेट्रोल पंपाजवळ, घोडेगाव, ता. नेवासा) यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी मतदान केंद्रावरील प्रत्येक बुथवर वेबकॅमेरे बसविले.

Polling Station : मतदान केंद्रांवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाली चोरी
Polling Station : मतदान केंद्रांवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाली चोरी

२५ हजार रुपयाचे कॅमेरे नेले चोरून (Polling Station)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर, केडगाव येथील बुथ क्रमांक २६७ मधील आतील बाजुचा कॅमेरा नंबर एच एफ ४ जी ०५३८८४ तसेच बुथ क्र- २६९ येथील बाहेरील बाजुचा कॅमेरा क्र एच एफ ४ जी ०७१२७७ त्यानंतर बुथ क्र २७० बाहेरील बाजुचा कॅमेरा क्र- एच एफ ४ जी ०६५७५० तसेच हिराबाई सुर्यवंशी प्राथमिक शाळा माळीवाडा, रुम नं ३ बुध नं. २२२ बाहेरील बाजुचा कॅमेरा नं एच एफ ४ जी ०५०७३७, रुम नं-२ बुथ नं. २२१ बाहेरील बाजुचा कॅमेरा नं- एच एफ ४ जी ०६६६३९, असे वेगवेगळ्या नंबरचे कॅमेरे बसवण्यात आले होते.याबाबत २५ हजार रुपयाचे कॅमेरे अज्ञात व्यक्तीने चोरून नेले असल्याचे महेश गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.