Pomfret Fish Get GI Rating : ‘पापलेट’ माश्याला आता जीआय मानांकन मिळणार

आता पापलेट माशाचं जीआय नामांकन (GI Rating) दिलं जाणार आहे. यासंदर्भात मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माहिती दिली आहे.

0
'पापलेट' माश्याला आता जीआय मानांकन मिळणार

नगर : सर्व मासेप्रेमींच्या आवडत्या पापलेट माशाला (Pomfret Fish) राज्यमासा (State fish) घोषित करण्यात आले आहे. मात्र आता पापलेट माशाचं जीआय नामांकन (GI Rating) दिलं जाणार आहे. यासंदर्भात मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माहिती दिली आहे.

नक्की वाचा : सासू-सासऱ्याचे अतिक्रमण सुनेला भोवले; ग्रामपंचायत सदस्यपद गेले

अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत ६०९ जणांवर कारवाई करत तीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, १३ पॉईंट पाचपेक्षा कमी सेंटीमीटर आकाराचा पापलेट मासा पकडण्यावरही बंदी घालण्यात आल्याची माहिती वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. कोणतीही परवानगी न घेता जेव्हा  छोटे मासे जेव्हा पकडले जातात, त्यामुळे भविष्यामध्ये मासे टंचाई होण्याची शक्यता आहे. म्हणून आत्तापर्यंत कारवाई करत ३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : लाचखोर महिला तलाठीसह खासगी मदतनीस ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

पापलेट माश्याचा नैसर्गिक अधिवास समुद्र आहे. त्यामुळे त्याला राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले आहे. १३.५ सेंटीमीटरचा हा मासा पकडता येणार नाही. जोपर्यंत हा पापलेट मासा प्रजननासाठी योग्य होऊन प्रजनन करत नाही, तोपर्यंत हा मासा पकडता येणार नाही, असं सांगण्यात आले आहे. जास्त प्रमाणामध्ये हा मासा मच्छिमार बांधवांना पोहोचवण्याच्या दृष्टीनं त्यांना पकडण्याच्या दृष्टीनं, त्यांचं संरक्षण राज्य मासा घोषित करताना केलेलं आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here