Pooja Khedkar : पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर

Pooja Khedkar : पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर

0
Pooja Khedkar : पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर
Pooja Khedkar : पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर

Pooja Khedkar : नगर : जात आणि अपंगत्व (Disability) कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि त्यांचं कुटुंबीयांचा आठ कंपन्यांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. यातील पाच कंपन्या खेडकर यांचे पालक, दिलीप आणि मनोरमा यांच्याशी संबंधित पुण्यातील (Pune) व्यावसायिक पत्त्यावरून चालवल्या जात आहेत. एकूण, आठपैकी सात कंपन्या डिलिजेन्स ग्रुपच्या छत्राखाली स्थापन केल्या आहेत. तर आठवी म्हणजे पूजा ऑटोमोबाईल्स ही एक फर्म असू यामध्ये मनोरमा तिच्या भावाबरोबर भागीदार आहे.

नक्की वाचा: अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

व्यावसायिक भूखंडाचा पत्ता रेशन कार्डमध्ये नमूद

डिलिजन्स कंपन्यांमध्ये थर्मोवेरिटा इंजिनिअरिंगचा समावेश आहे. या कंपनीच्या नावे दोन अलिशान गाड्याआहेत. या कंपनीच्या शेअरहोल्डर्समध्ये लता बांगर यांचा समावेश आहे. लता बांगर या दिलीप खेडकर यांची बहीण असून महादेव बांगरसुद्धा या कंपनीचे शेअरधारक आहेत. पुण्यातील तळवडे येथील व्यावसायिक भूखंड मनोरमा खेडकर यांच्या नावे असून पूजाने हाच पत्ता रेशन कार्डमध्ये नमूद केला आहे. हे रेशन कार्ड त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्याकरता दिल होतं. इतर डिलिजेन्स कंपन्यांमध्ये दोन “साखर आणि कृषी” कंपन्या समाविष्ट आहेत, त्या सर्वांमध्ये खेडकर किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्याशी जोडलेले इतर संचालक किंवा भागधारक म्हणून सूचीबद्ध आहेत.

अवश्य वाचा: मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार – अजित पवार

पूजा आणि मनोरमा खेडकर अनेक कंपन्यांमध्ये भागीदार (Pooja Khedkar)

डिलिजेन्स ग्रुपच्या कंपन्यांपैकी डिलिजेन्स इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये पूजा खेडकर यांनी २०१८ मध्ये २० टक्के हिस्सा घेतला होता. तिचा भाऊ पियुष २०२२ मध्ये ओम दीप शुगर अँड ऍग्रोमध्ये ५० टक्के स्टेक होता. तर, डिलिजेन्स शुगर अँड ॲग्रो, डिलिजेन्स (इंडिया) कॉर्पोरेशन आणि डिलिजेन्स इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपन्यांमध्ये मनोरमा खेडकर २०१८ पर्यंत भागधारक होत्या. महत्त्वाचं म्हणजे ओम दीप शुगर अँड ॲग्रो वगळता इतर सहा डिलिजेन्स ग्रुप कंपनीने २०१९ नंतर वार्षिक रिटर्न भरलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here