Pooja Khedkar : नगर : पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना दिव्यांगाची बनावट प्रमाणपत्रे (Fake Certificate) देणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील दाेन, तर अन्य चाैघांवर गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला. जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. साहेबराव डावरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा: विदर्भात पावसाचे थैमान! हवामान विभागाकडून अलर्ट जारी
वैद्यकीय तपासणी न करता कर्णबधीर बनावट अपंग प्रमाणपत्र
नगर जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे. प्रसाद संजय बडे (पाथर्डी), सुदर्शन शंकर बडे (पाथर्डी), सागर भानुदास केकाण (रा. पागोरी पिंपळगाव, पाथर्डी), गणेश रघुनाथ पाखरे (माणिकदौंडी, पाथर्डी) योगेश बनकर (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) गणेश गोत्राळ (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: मोठी बातमी! मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार
रजिस्टरला कोणतेही प्रमाणपत्र दिले नसल्याचा वैद्यकीय अहवाल (Pooja Khedkar)
दरम्यान, नगर शहरातील सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले जात असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली होती. त्यांनी वरील चौघांची नावेही संशयित म्हणून तसेच त्यांनी कर्णबधीर असल्याचे दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र घेतल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाने अंतर्गत चौकशी केली. त्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या दिवशी रजिस्टरला कोणतेही संबंधित व्यक्तींना प्रमाणपत्र दिले नसल्याचे तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल कागदपत्रेही उपलब्ध नाही. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा रुग्णालय प्रशासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.