नगर : राज्यासह देशभरात चर्चा झालेल्या माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेत. येत्या २ मे रोजी सकाळी १०.३० वाजता पूजा खेडकरला दिल्ली क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २१ मे ला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
नक्की वाचा : ‘आम्ही एकत्र येणं कठीण नाही’;उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत काय घडलं ? (Pooja Khedkar)
पुजा खेडकर प्रकरणी आज दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. यावेळी दिल्ली पोलिसांच्या वतीने खेडकरच्या कोठडीची मागणी करण्यात आली.यावर युक्तिवाद करत असताना कोठडीत चौकशीची आवश्यकता नसल्याचे मत पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयात मांडत जोरदार युक्तिवाद केलाय.दरम्यान जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम असेल. मात्र,आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नसल्याचे निरीक्षण ही न्यायालयाने मांडले आहे. तर पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहील आणि चौकशीत सहकार्य करेल, अशी ग्वाही खेडकरांच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देईल आणि पूजा खेडकर या चौकशीला कशा पद्धतीने समोर जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अवश्य वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या पी.एफ.गुंतवणुकीवरील १०० कोटींचे व्याज बुडीत
पूजा खेडकरने १२ वेळा परीक्षा दिली (Pooja Khedkar)
यावेळी माहिती देताना दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, पूजा खेडकर १२ वेळा परीक्षेला बसल्या. जरी त्या दिव्यांग असल्या तरीही ९ वेळा परीक्षा दिल्या जाऊ शकतात. त्यांनी नावे बदलली, १२ वेळा त्यांनी परीक्षा दिली. तर युपीएससीच्या वकिलांनी युक्तिवाद करत असताना सांगितले की,पूजा खेडकर च्या पाठीशी एक पॉवरफुल सिस्टम आहे. तर यावर प्रतिवाद करताना पूजा खेडकरचे वकील म्हणाले की, खेडकर दिव्यांग आहेत आणि त्यासाठीची प्रमाणपत्र तपासणी एम्सने केली आहे.