Popatrao Pawar : प्रमोद कांबळे यांच्या शिल्पकृतीमुळे सचिन तेंडुलकरला झाली नगरची ओळख : पोपटराव पवार

Popatrao Pawar : प्रमोद कांबळे यांच्या शिल्पकृतीमुळे सचिन तेंडुलकरला झाली नगरची ओळख : पोपटराव पवार

0
Popatrao Pawar : प्रमोद कांबळे यांच्या शिल्पकृतीमुळे सचिन तेंडुलकरला झाली नगरची ओळख : पोपटराव पवार
Popatrao Pawar : प्रमोद कांबळे यांच्या शिल्पकृतीमुळे सचिन तेंडुलकरला झाली नगरची ओळख : पोपटराव पवार

Popatrao Pawar : नगर : आपल्या शिल्पकलेच्या माध्यमातून नगर शहराला वेगळी ओळख प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांनी मिळवून दिली आहे. वानखेडे स्टेडियम इथे बीसीसीआयच्या (BCCI) निर्देशानुसार प्रमोद कांबळे यांनी सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) शिल्प  साकारले आणि त्यामुळे सचिन तेडुलकरला नगरची ओळख झाली. नगर त्यांना माहीत झाले, असे गौरवोद्गार पदमश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी काढले.

नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

सचिन तेंडुलकर यांच्या शिल्पाचे जगभरातून कौतुक

नगरचे नाव ऐतिहासिक, राजकीय आणि कलेच्या क्षेत्रातही आदराने घेतले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे. आजवर प्रमोद कांबळे यांनी अनेक शिल्पकृती साकारल्या ज्या देशोदेशी वाखाणल्या गेल्या. त्यांना त्यांच्या या कलेसाठी आजवर अनेक  पुरस्कारानीही नामांकित केले गेले आहे. मात्र, आपल्याकडे क्रिकेट विश्वात ज्याना देव मानले जाते, असे जगाचे लाडके क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या ब्राँझमधील शिल्पकृतीचे काही दिवसांपूर्वीच वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण करण्यात आले. सचिन तेंडुलकर यांच्या या २२ फुटी शिल्पाचे जगभरातून कौतुक झाले.  या अप्रतिम शिल्पकृतीच्या १०० रिप्लिका बीसीसीआयने भेट म्हणून देण्यासाठी तयार करून घेतल्या. त्यानंतर आता प्रमोद कांबळे यांनी या रिप्लिका नगरमधील क्रिकेटप्रेमी आणि दिग्गजांना भेट म्हणून देण्याचे ठरवले आहे. त्याचा प्रारंभ त्यांनी आपल्या स्टुडिओतून केला. या प्रतिकृतीच्या पहिल्या तीन कॉपी आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच आणि राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, नगरचे प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदिया आणि कोहिनूर उद्योग समूहाचे संचालक अश्विन गांधी यांना देण्यात आल्या.

अवश्य वाचा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

ग्रामविकासात मिळालेले यश हे क्रिकेटमुळे (Popatrao Pawar)

याप्रसंगी बोलताना पोपटराव पवार यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मला ग्रामविकासात मिळालेले यश हे क्रिकेटमुळे मिळालेले आहे. या क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्या २२ फुटी पुतळ्याची छोटीशी प्रतिकृती मिळाल्यामुळे आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय नरेंद्र फिरोदिया म्हणाले, ”नगरमधील एका शिल्पकाराने तयार केलेले शिल्प आज जगभरात नावाजले जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे.” तर त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना कोहिनूर उद्योग समूहाचे संचालक अश्विन गांधी म्हणाले, ”भारतातल्या फक्त १०० लोकांकडे ही प्रतिकृती आहे आणि त्यापैकी मी एक आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतोय.” असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here