Pori Amhi Marathi Pori Song:किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या’पोरी आम्ही मराठी पोरी’ गाण्याला उदंड प्रतिसाद

0
Pori Amhi Marathi Pori Song:किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या'पोरी आम्ही मराठी पोरी' गाण्याला उदंड प्रतिसाद
Pori Amhi Marathi Pori Song:किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या'पोरी आम्ही मराठी पोरी' गाण्याला उदंड प्रतिसाद

Pori Amhi Marathi Pori Song: सध्या चर्चेत असलेल्या सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपट ‘शातिर द बिगिनिंग’चे (Shatir The Begining) दमदार गीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे तीर्थस्थान असलेल्या किल्ले रायगडावर तब्बल २०० कलाकारांच्या सहभागाने या भव्य गीताचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘सावित्रीच्या लेकी आम्ही, शिवबाच्या तलवारी,पोरी आम्ही मराठी पोरी’ (Pori Amhi Marathi Pori Song) असे बोल असलेल्या या दमदार मराठमोळ्या गाण्याला समाज माध्यमांमधून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नवी माहिती   

गायिका वैशाली सामंत यांचा गाण्याला स्वरसाज (Pori Amhi Marathi Pori Song)

या गीतामधून मराठी महिलांच्या कर्तृत्वाची गाथा आणि त्यापासून मराठी पोरींना मिळणारी प्रेरणा दर्शविण्यात आली आहे. वैभव देशमुख या चित्रपटाचे गीतकार आहे. तर रोहित नागभिडे यांचे या गाण्याला संगीत आहे. प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी या गाण्याला स्वरसाज चढविला आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात

‘शातिर:द बिगिनिंग’ चित्रपट ९ मे ला होणार प्रदर्शित (Pori Amhi Marathi Pori Song)


‘शातिर:द बिगिनिंग’ या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पटकथा सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे. या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत आहे. त्यांच्यासह मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, श्रेया कुलकर्णी, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी ‘शातिर:द बिगिनिंग’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here