Nakhrewaalii Movie:जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय व्हॅलेंटाईन डे ला घेऊन येणार ‘नखरेवाली’;पोस्टर प्रदर्शित 

जिओ स्टुडिओ (Jio Studio) आणि चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या सहकार्याने त्यांच्या आगामी निर्मिती 'नखरेवाली'च्या (Nakhrewaali) पहिल्या पोस्टरच अनावरण (Poster Relese) केल आहे

0
Nakhrewaalii Movie:जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय व्हॅलेंटाईन डे ला घेऊन येणार 'नखरेवाली'
Nakhrewaalii Movie:जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय व्हॅलेंटाईन डे ला घेऊन येणार 'नखरेवाली'

नगर : जिओ स्टुडिओ (Jio Studio) आणि चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या सहकार्याने त्यांच्या आगामी निर्मिती ‘नखरेवाली’च्या (Nakhrewaali) पहिल्या पोस्टरच अनावरण (Poster Relese) केल आहे. ज्यामध्ये नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत. जिओ स्टुडिओ -राहुल शांकल्या दिग्दर्शित कलर यलो प्रॉडक्शनचा उपक्रम असलेल्या या बॉलीवूडच्या रोम-कॉम मध्ये काय बघायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक असेल.

नक्की वाचा : भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय;पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद  

जिओ स्टुडिओ आणि कलर यलो प्रॉडक्शनची इन्स्टाग्राम पोस्टद्वारे घोषणा (Nakhrewaalii Movie)

नखरेवाली चित्रपटाची पहिली रोमांचक झलक नक्कीच खास आहे. जिओ स्टुडिओ आणि कलर यलो प्रॉडक्शन यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे, प्यार का नया नखरा लेके आ रहे हैं व्हॅलेंटाइन २०२५ पर.

या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त करताना, आनंद एल राय म्हणाले “जेव्हा आम्ही नखरेवालीची संकल्पना मांडली तेव्हा मला माहित होते. आम्ही यांची निर्मिती करू. हा चित्रपट नक्कीच मनोरंजक असणार आहे. यात शंका नाही. ज्योती आणि जिओ स्टुडिओच्या अतुलनीय पाठिंब्याने आम्ही सर्व वयोगटांसाठी लोकासाठी काही जादुई चित्रपट बनवू इच्छितो. नखरेवालीचा फर्स्ट लुक आउट करताना आमहाला आनंद होत आहे. नखरेवालीसोबत अंश आणि प्रगतीच्या सारखे नवखे कलाकार आम्हाला सापडले. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांना या दोघांची ऊर्जा चित्रपटगृहांमध्ये अनुभवण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही”

अवश्य वाचा : राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी;हवामान विभागाचा अंदाज

१४ फेब्रुवारी २०२५ ‘नखरेवाली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Nakhrewaalii Movie)

राहुल शांकल्या दिग्दर्शित आणि दिव्य निधी शर्मा लिखित नखरेवालीची निर्मिती ज्योती देशपांडे आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांनी केली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॅलेंटाईन डे ला नखरेवाली चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here