
Powerlifting Competition : नगर : मॉस्को, रशिया (Russia) येथे ४ ते ७ डिसेंबर दरम्यान वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या (World Raw Powerlifting Federation) वतीने घेण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना अहिल्यानगरचा खेळाडू देवदत्त गुंडू (Devdutt Gundu) याने १२५ किलो हेवीवेट गटात रौप्यपदक पटकावले. या क्षेत्रात आजपर्यंत असलेली मॉस्कोची मक्तेदारी मोडीत काढून देवदत्त गुंडू याने देशाला पहिल्यांदाच रौप्यपदक मिळवून दिले आहे.
अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना
तिघांच्या यशाबद्दल शहरात जल्लोषात स्वागत
या स्पर्धेत देवदत्तचे विद्यार्थी किशोर शिंदे याने मास्टर वन कॅटेगरीमध्ये ८२.५ किलो वजन गटात सुवर्णपदक व अमोल गायकवाड याने १०० किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. या तिघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेल्या या यशाबद्दल बुधवारी (ता. १२) अहिल्यानगर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने दिल्लीगेट भागातून त्यांची वाजत गाजत, फटाक्यांची अतिषबाजी करून व गुलालाची उधळण करत बग्गीतून मिरवणूक काढून विजयाचा सोहळा साजरा केला. यावेळी या तिन्ही खेळाडूंनी अभिमानाने देशाचा तिरंगा झेंडा हातात घेऊन हा स्वागत सोहळा साजरा केला.

नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
मॉस्कोची मक्तेदारी देवदत्तने काढली मोडीत (Powerlifting Competition)
या सन्मान सोहळ्यात देवदत्त गुंडू, किशोर शिंदे व अमोल गायकवाड या तिन्ही खेळाडूंचा विविध क्षेत्रातील नागरिकांनी व नातेवाईकांनी मोठे हार व शाल देऊन सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी मुलाने मिळवलेल्या एवढ्या मोठ्या यशाचे कौतुक पाहताना व औक्षण करताना तिन्ही खेळाडूंच्या आईंचे डोळे पाणावले. देवदत्त गुंडू यांचे वडील प्रवीण गुंडू म्हणाले, देवदत्त याने अतिशय अवघड व चूर्शीच्या पॉवरलिफ्टिंग खेळाच्या स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावत राज्यात व देशात पहिल्यांदाच रौप्य पदक मिळवले आहे. या स्पर्धेत आजपर्यंतची मॉस्कोची असलेली मक्तेदारी देवदत्त याने मोडीत काढू नवा इतिहास रचला आहे.
डब्लूआरपीएफचे महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी त्यांचे विधेविशेष अभिनंदन करून सांगितले की या कॅटेगरीमध्ये सहसा कोणीही उतरत नाहीत. पण देवदत्त व त्यांचे विधार्थी कोशोर व अमोल यांनी भरपूर मेहनत घेऊन या अवघड स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे. देवदत्त गुंडू म्हणाले, माझ्या आई वडिलांनी व प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी एवढे मोठे यश संपादन करू शकलो. भविष्यात अजून मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभगी होऊन त्यात यश संपादन करून नगरचे नावलौकिक वाढवणार आहे. यावेळी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम, संतोष गेनाप्पा, राजूमामा जाधव, संजय वल्लाकटी, अजय झिंजे, तसेच प्रमोद गुंडू, विद्या गुंडू, चंद्रकांत गुंडू, विनोद गुंडू, दिनेश गुंडू, नागरबाई शिंदे, कासूबाई गायकवाड, संजय झिंजे आदींसह नागरिक उपस्थित होते.


