Prajakt Tanpure : महाराजांचा पुतळा कोसळला, हा काळा दिवस : तनपुरे

Prajakt Tanpure : महाराजांचा पुतळा कोसळला, हा काळा दिवस : तनपुरे

0
Prajakt Tanpure : महाराजांचा पुतळा कोसळला, हा काळा दिवस: तनपुरे
Prajakt Tanpure : महाराजांचा पुतळा कोसळला, हा काळा दिवस: तनपुरे

Prajakt Tanpure : राहुरी: महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांंचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळला, हा काळा दिवस म्हणावा लागेल. याप्रकरणी केवल शिल्पकार व कंत्राटदार यांचेवर गुन्हा दाखल होवून काम भागणार नाही. या प्रकरणी जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केली. राहुरीत बाजार समितीसमोर आयोजित उपोषण प्रसंगी ते बोलत होते.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

दिवसभर लाक्षणिक उपोषण

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने दिवसभर लाक्षणिक उपोषण झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवून उपोषणाची सांगता झाली. विविध संघटना, व्यक्ती यांनी उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी लोणी येथील प्रतिभाताई घोगरे यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

यांची उपस्थिती (Prajakt Tanpure)

उपोषण स्थळी समितीचे सभापती अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, सुरेश वाबळे, विजय डौले, सागर तनपूरे, आप्पासाहेब ढूस, किरण कडू, सुरेश निमसे, ज्ञानेश्वर बाचकर आदि उपस्थित होते. तर रामदास बाचकर, निलेश जगधने, साठे सर, दादासाहेब मुंडे, बाबासाहेब भिटे, रवींद्र आढाव, दत्तात्रेय कवाणे, सुनील आडसुरे, शिवरत्न शेटे, हसन सय्यद, एम. डी. सोनवणे, मिलींद अनाप, रामेश्वर सोनवणे, सचिन बोरुडे आदींची यावेळी भाषणे झाली.