Prajakt Tanpure | प्राजक्त तनपुरे यांची विधीमंडळातील उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड

0
Prajakt Tanpure
Prajakt Tanpure

Prajakt Tanpure | राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने २०२३-२४ सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेकडून यापूर्वी २०१८-१९मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यात आला होता.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी काही पुरस्कार दिले जातात. त्यातील दोन पुरस्कार मागील सहा वर्षांत नगर जिल्ह्यातील आमदारांना मिळाले आहेत. यात बाळासाहेब थोरातांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपुरे यांचीही वर्णी लागली आहे. अभ्यासपूर्ण विषय मांडणी, सर्व विधीमंडळ सदस्यांचा मानराखत भाषण करण्याची पद्धती यामुळे तनपुरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या संदर्भात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ट्विट करत माहिती दिली की, राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला विधानसभेत निवडून पाठविले. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.

अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

विधीमंडळात जनहिताचे मुद्दे मांडताना शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन तसेच माझ्या मतदारसंघातील जनता यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणूनच हा बहुमान मी माझ्या मतदारसंघातील जनता, आई-वडील तसेच वडीलधाऱ्या नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. जनहिताचे काम करण्यासाठी मिळालेली ही ऊर्जा आपल्या सर्वांच्या साथीने अक्षय्य राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here