Prajakt Tanpure : नगर : विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) महाविकास आघाडीला मोठ्या पराभवला सामोर जावे लागले. त्यामुळे आघाडीच्या अनेक पराभूत उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे ईव्हीएम (EVM) पडताळणी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राहुरी मतदार संघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी पाच केंद्रांतील ‘ईव्हीएम’विषयी शंका उपस्थित केली होती. मात्र, त्यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी सादर केलेला अर्ज लेखीपत्र देऊन मागे घेतला आहे.
नक्की वाचा : शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य: चौहान
‘ईव्हीएम’ पडताळणीसाठी भरले २ लाख ३६ हजार रुपये
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जनमताचा कौल मिळेल, अशी अपेक्षा बाळगलेल्या महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला. महाविकास आघाडीने या पराभवाचे खापर ‘ईव्हीएम वर फोडले. ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत मतदान, डेटा पडताळणीसाठी अर्ज दाखल केले. राहुरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला. या ‘ईव्हीएम’ मशीन पडताळणीसाठी त्यांनी २ लाख ३६ हजार रुपये भरले होते. दरम्यान भारत निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम फेर तपासणीची तारीख निश्चित केली जाते. ही तारीख जाहीर झाल्यानंतर त्या तारखेच्या आधी तीन दिवसापर्यंत संबंधित उमेदवार फेर पडताळणीची मागणी मागे, घेऊ शकतो. त्यानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तपासणीचा आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडे तपासणीसाठी जमा केलेली रक्कम नियमानुसार विहित पद्धतीने तनपुरे यांना पुन्हा दिली जाणार आहे.
अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी केली ‘ही’ मागणी
या उमेदवारांना अर्ज दाखल करता येतो (Prajakt Tanpure)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला संबंधित मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांच्या ५ टक्के मतदान केंद्रांतील ईव्हीएम अर्थात मतदान यंत्राची तपासणी करण्याची मान्यता आहे. एका मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या तपासणीसाठी ४७ हजार २०० रुपये फी संबंधित उमेदवाराने त्यासाठी आयोगाकडे मागणी अर्जासोबत जमा करणे बंधनकारक आहे.