नगर : आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) यांची जाहीरपणे माध्यमांसमोर येऊन माफी मागितल्यानंतर आता प्राजक्ता माळीनेही सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर आपण कुठलीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच,आमदार सुरेश धस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जाहीरपणे माफी मागितल्यानंतर दादा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात,असे म्हणत प्राजक्ताने सुरेश धस यांच्याबद्दलही चांगले उद्गार काढले आहेत.
नक्की वाचा : ‘इस्रो’ने रचला इतिहास; स्पॅडेक्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण
प्राजक्ता माळी-सुरेश धस वाद संपुष्टात (Prajakta Mali)
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वेगळ्याच वादाचं तोंड फुटलेला प्राजक्ता माळी-सुरेश धस यांच्या वादाचा मुद्दा आता संपुष्टात आला आहे. दरम्यान,आमदार धस यांनी भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत फोनवर झालेल्या संवादानंतर व्हिडिओच्या माध्यमातून प्राजक्ता माळीची जाहीरपणे माफी मागितली होती. त्यानंतर,आता प्राजक्ता माळीनेही धस यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान,यापूर्वी धस यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली होती.
अवश्य वाचा : ‘गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही’;संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
‘दादा,तुम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक आहात’ -प्राजक्ता माळी (Prajakta Mali)
आमदार सुरेश धस यांनी अत्यंत मोठ्या मनाने घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली,त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. दादा, तुम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंय. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती, हे आपण सगळे जाणतो. ही छत्रपतींची भूमी आहे आणि इथे छत्रपतींचे विचार पुढे चालवले जातात, हेच तुम्ही ह्या कृतीतून दाखवून दिलंय,असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.
पराजकता पुढे म्हणाली की,आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्याने मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. माझ्या बाजूने या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकते. आम्ही व्यक्त झालो की आमच्यावर टोळ धाड पडते, असे म्हणत तिने खंतही व्यक्त केली आहे. कुठलंही आंदोलन, कुठलाही मोहीम, कुठलाही मोर्चा डायव्हर्ट करण्याचा माझा हेतू नव्हता. आमदार धस हे बोलले नसते तर मलाही अशाप्रकारे हे काही करायची गरज नव्हती, असे स्पष्टीकरण प्राजक्ता माळीने दिले आहेत.