Prajakta Mali:प्राजक्ता माळीची चाहत्यांना वाढदिवसाची भेट,’फुलवंती’ची रिलीज डेट जाहीर

प्राजक्ता माळीची निर्मिती असलेल्या फुलवंती या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

0
Prajakta Mali
Prajakta Mali

Prajakta Mali In fulvanti Movie : आपल्या दमदार अभिनयाने आणि गोड हास्याने अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकते.आता प्राजक्ताने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर प्राजक्ताने सिनेनिर्मिती उतरणार असल्याची घोषणा केली होती. प्राजक्ताची निर्मिती असलेल्या फुलवंती (Fulvanti) या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज (Motion Poster Relese) करण्यात आले असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री स्नेहल तरडे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. हा चित्रपट दिवगंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित आहे. येत्या ११ ऑक्टोबरला ‘फुलवंती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नक्की वाचा : “आई कुस्ती जिंकली, मी हरलेय”…ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला रामराम

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये काय ? (Prajakta Mali)

नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली ‘फुलवंती’ दिमाखत बसलेली दिसत आहे. या पोस्टरमध्ये प्राजक्ता माळीचा फुलवंतीच्या रूपातील कातील लूक दिसून आला आहे. या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल. पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज आहे. मुळात पहिली झलक पाहूनच ‘फुलवंती’ ची भव्यता कळतेय. रसिकप्रेक्षकांसाठी सांगीतिक नजराणा असलेला हा चित्रपट; मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा : रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता’या’दिवशी मिळणार

‘फुलवंती’च्या भूमिकेबद्दल काय म्हणाली प्राजक्ता ? (Prajakta Mali)


‘फुलवंती’बद्दल प्राजक्ता माळी म्हणते, ”या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले; याबद्दल देवाचे अनेकानेक आभार. ‘फुलवंती’ माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की ‘फुलवंती’च का ? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले. साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी ‘फुलवंती’ एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ‘फुलवंती’ या कांदंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य ‘फुलवंती’ तुमच्यापर्यंत घेऊन येत

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार ॲन्ड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रॉडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी, सहनिर्माते आहेत तर विक्रम धाकतोडे सहाय्यक निर्माते आहेत. या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले असून प्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश – विश्वजीत यांनी सांभाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here