Prakash Ambedkar : महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल!

Prakash Ambedkar

0
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : नगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) नुकतेच पत्रकार परिषद घेत देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वेळापत्रक जाहीर केले. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. परंतु, निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : लाेकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; नगर जिल्ह्यात कधी होणार मतदान जाणून घ्या…

या ठिकाणी बर्फ पडतो का?

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घ्यायला या ठिकाणी बर्फ पडतो की दळणवळणाच्या समस्या आहेत, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात इलेक्शन मी 1984 पासून लढत आहे. कुठेही दंगा झालेला नाही, दगड मारायला कुठे माणूस मिळत नाही. त्यामुळे दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात का घ्यावा लागत आहे, याचे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने द्यावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य

दोन टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी (Prakash Ambedkar)


पाच टप्प्यात निवडणूक का घ्यावी लागत आहे याचे स्पष्टीकरण आंबेडकरांनी निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. निवडणूक आयोग शांत महाराष्ट्र अशांत करायला निघाला आहे का? आमचं म्हणणं आहे की, लोकसभा निवडणूक दोन टप्प्यात झाली पाहिजे. पहिल्या टप्प्यात राज्यातील लोकसभेच्या 24 आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 24 जागांची निवडणूक घ्यावी. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here