Prakash Ambedkar : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

Prakash Ambedkar : वसंत मोरेंची वाटचाल 'वंचित'च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

0
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : नगर : मनसेतून (MNS) बाहेर पडलेले पुण्याचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी शुक्रवारी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे वसंत मोरे हेच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार

३१ मार्च किंवा १ एप्रिलला घोषणा

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगताना म्हणाले की आजची बैठक सकारात्मक झाली आहे. याबाबत दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याचंही ते म्हणाले. यावरुन पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार ठरल्याचं स्पष्ट होत आहे. याची घोषणा ३१ मार्च किंवा १ एप्रिल रोजी होणार आहे.

नक्की वाचा: पाय घसरून पडल्याने दिलीप वळसे पाटील जखमी

सकारात्मक चर्चा (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वसंत मोरे म्हणाले की, आज पहिल्यांदाच चर्चेला आलेलो आहे. पुण्याची निवडणूक चौथ्या टप्प्यात असून लांब आहे. पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये आणखी चर्चा होईल. आजची चर्चा सकारात्मक दृष्टीने झालेली आहे. उमेदवारीबाबत प्रकाश आंबेडकर दोन-तीन दिवसांमध्ये भूमिका जाहीर करतील.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वसंत मोरे यांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात होणार असून याबाबत ३१ मार्चपर्यंत अधिकृत माहिती दिली जाणार आहे. अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचा शेप दोन-दिवसांमध्ये निश्चित होणार आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झाली असून त्याचाच एक भाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here