Prakash Ambedkar : श्रीरामपूर : गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केलं आहे. १० वर्षात मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता त्यांनी सांगावे, देश टिकविण्यासाठी आता आपल्याला या बाबींचा विचार करावाच लागेल,असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.
हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या
उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे सभा
लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे संविधान निर्धार सभा पार पडली, या सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण होते. यावेळी राज्य प्रवक्ता दिशा शेख, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, चरण त्रिभुवन, किशोर ठोकळ, बाबा शेख, शिवा साठे, प्रमोद बारशे आदींसह अनेकजण उपस्थित होते. महापुरुषांना अभिवादन करुन तसेच समता सैनिक दलाची सलामी होऊन सभेस सुरवात झाली.आंबेडकर म्हणाले, मोदींचे पंतप्रधान कार्यालय आता ईडी, सीबीआय व जीएसटीमुळे वसुली कार्यालय झाले आहे. इलेक्ट्रोल बॉंड हा देशामधील सर्वात मोठा घोटाळा असून भाजप सरकारने हा केला आहे. कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने जगात सर्वत्र रेमडेसिवीरवर बंदी घातली असताना मोदी सरकारने देशात खुलेआम हे इंजेक्शन वापरुन देशवासियांच्या जीवाशी खेळ केला.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
रूपवतेंची दोन्ही उमेदवारांवर टीका (Prakash Ambedkar)
वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, आपल्या विरोधातील दोनही उमेदवार हे बिनकामाचे आहेत. एकावर घोटाळ्याचे आरोप आहे तर दुसरा कोणत्या पक्षात आहे तेच कळत नाही. ७५ वर्षांमधे प्रथमच महिलेला उमेदवारी मिळाली असून वंचितने कायमच महिलांचा व तळागाळातील जनतेचा विचार केला आहे.