Prakash Ambedkar : “शिवसेना एकनाथ शिंदेंचीच” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर

Prakash Ambedkar : “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर

0
Prakash Ambedkar : “शिवसेना एकनाथ शिंदेंचीच” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर

Prakash Ambedkar : नगर : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांशी बोलताना खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे, असं विधान काल केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रकाश आबंडेकरांच्या विधानाला आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार

संजय राऊत हे मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा चालवला पाहिजे. जर त्यांना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. रामदास आठवले यांचाही पक्ष आहे. काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

अवश्य वाचा: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका

सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला (Prakash Ambedkar)

शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे. सुषमा अंधारेंनी म्हटलंय की, स्ट्राईक रेटसारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची हे ठरत असेल तर मग आरपीआय चळवळीचा एकमेव माणूस सातत्याने खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे. याचा अर्थ नेतृत्व फक्त आणि फक्त आठवले साहेबच करू शकतात, असा टोला सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.

Prakash Ambedkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here