नगर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांची प्रकृती बिघडल्याचे माहिती समोर आली आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने आज पहाटेच्या सुमारास त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी (Angiography) होणार असल्याची माहिती आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे.
नक्की वाचा : “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी,मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय”-शरद पवार
प्रकाश आंबेडकर पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल (Prakash Ambedkar)
हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली. पुढील ३-५ दिवस प्रकाश आंबेडकर रूग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडी प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
अवश्य वाचा : ‘मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही’- देवेंद्र फडणवीस
आंबेडकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु (Prakash Ambedkar)
वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काही तासात त्यांची अँजिओग्राफी केली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकरांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.