Prakash Ambedkar:’आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला निवडून आणा’-प्रकाश आंबेडकर 

0
Prakash Ambedkar:'आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला निवडून आणा'-प्रकाश आंबेडकर 
Prakash Ambedkar:'आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला निवडून आणा'-प्रकाश आंबेडकर 

Prakash Ambedkar : ‘आरक्षण वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) निवडून आणणे. ओबीसींचेही आरक्षण (Reservation) राहील,एससी एसटी यांचेही आरक्षण राहील. क्रीमीलेयर सुद्धा जाईल हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीला साथ द्या,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे.

नक्की वाचा : ‘मी स्वत:मराठा समाजाला आरक्षण देणार’-एकनाथ शिंदे

‘प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा’ (Prakash Ambedkar)

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने आरक्षण आणि वर्गीकरणाचा जो निर्णय दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठीत केली. ज्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि बार्टीचे एक अधिकारी आहेत.त्यांचा अहवाल समोर आला आहे. क्रीमीलेयर आणि आरक्षण वर्गीकरण या दोन्ही गोष्टी लागू होतील,असा सावधानतेचा इशारा देखील आंबेडकर यांनी दिला आहे. हा निर्णय जरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला असला, तरी त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी पाठिंबा दिला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 

अवश्य वाचा : आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

‘वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा मार्ग नाही’ (Prakash Ambedkar)

आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने म्हटले होते की, फुले शाहू आंबेडकरी हे मतदाराला हे फसवत आहे. हा त्याचा नमुना आहे. जो जीआर निघाल्यानंतर दर दहा मिनिटाला, पाच मिनिटाला कार्यकर्ते, अधिकारी आणि संघटनांचे फोनवर फोन चालू आहेत आणि आता काय केले पाहिजे हे विचारत आहेत. मी त्या सर्वांना सांगतोय की, यावर एकमेव उपाय म्हणजे स्वतंत्र विचारांचे आमदार निवडून आणणे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा मार्ग नसल्याचे त्यांनी सांगितलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here