Pramod Kamble : प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

Pramod Kamble : प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर

0
Pramod Kamble : प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर
Pramod Kamble : प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर


Pramod Kamble : नगर : पुणे येथील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या (D. Y. Patil International University) स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्सतर्फे आयोजित ‘आकृती २०२५-२६’ या वार्षिक शैक्षणिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन १० एप्रिल रोजी होणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांना यंदाचा मानाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार २०२६’ (Dr. D. Y. Patil Lifetime Achievement Award 2026) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

पुरस्कारांची लखलखती कारकीर्द

प्रमोद कांबळे यांच्या कलेचा प्रवास थक्क करणारा आहे. नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अयोध्येत त्यांच्या कलेचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’, नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ आणि मागील वर्षी भारतीय कलाप्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयातर्फे दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. केवळ नागरी सन्मानच नव्हे, तर हैदराबाद येथे भारतीय लष्कराकडून त्यांचा विशेष सन्मान झाला असून, भारतीय वायुदलाच्या एअर चीफ मार्शल यांच्या हस्ते विशेष मेडल देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये त्यांनी उभारलेल्या ‘शौर्य’ स्मारकाबद्दल त्यांचा भारतीय सैन्य दलाच्या प्रमुखांकडून विशेष मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या समृद्ध योगदानाची दखल घेऊनच डी. वाय. पाटील विद्यापीठाने हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आकुर्डी येथील विद्यापीठात हा सोहळा हाेणार संपन्न (Pramod Kamble)

शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता आकुर्डी येथील विद्यापीठ परिसरात हा सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ‘हंग्री फिल्म्स’चे संचालक आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज महेश घरत उपस्थित राहणार आहेत, तर सन्माननीय अतिथी म्हणून प्रसिद्ध कलाकार पराग बोरसे उपस्थित राहतील. जे बिल्डिंग, पहिला मजला, गणेश आयडॉल जवळ, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी येथे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे दर्शन सर्वांना घेता येईल.


या सोहळ्याला कुलपती डॉ. संजय डी. पाटील, कुलगुरू प्रा. मनीष भल्ला आणि स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्सचे संचालक जयप्रकाश कलवाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.


मुंबई येथील फोर्ट भागात भारतीय रिझर्व बँकेच्या चौकात इमारतीसमोर रिझर्व बँकेचे बोधचिन्ह तसेच रुपी सिम्बॉल चे स्मृतिशिल्प, आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा 22 फुटी पूर्ण कृती पुतळा, अयोध्येतील प्रदक्षिणा मार्गावर रामायणातील प्रसंगावर आधारित शिल्पकृती ही त्यांच्यासाठी आणि नगरकरांसाठी खरोखरच अभिमानास्पद कामगिरी आहे अशा प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहेत.