Praniti Shinde : जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी : प्रणिती शिंदे

Praniti Shinde : जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी : प्रणिती शिंदे

0
Praniti Shinde : जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी : प्रणिती शिंदे
Praniti Shinde : जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी : प्रणिती शिंदे

Praniti Shinde : संगमनेर : जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांनी निवडणूक लढवावी, असे वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वात इंदिरा महोत्सव घेण्यात आला, यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. त्यामुळे थोरातांचीही लेक विधानसभेच्या मैदानात (Assembly Elections) येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

अवश्य वाचा : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील

प्रणिती शिंदे म्हणाल्या,

बाळासाहेब थोरात यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही. संगमनेरला आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं. सोलापूर माझं गाव असलं तरी संगमनेर माझ्यासाठी घरच आहे. मी आमदार, खासदार झाले, मात्र महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम मी सुद्धा करू शकले नाही. गृहिणी खूप हुशार आहेत. मात्र, त्यांच्या उत्पादनांना मार्केट आता उभे राहिले आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला एकत्रित आल्या तर शक्तीपीठ निर्माण होतं, असे त्यांनी म्हटले.

Praniti Shinde : जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी : प्रणिती शिंदे
Praniti Shinde : जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी : प्रणिती शिंदे

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

खासदार असून सुरक्षित वाटत नाही तर सामान्य महिलांचे काय? (Praniti Shinde)

प्रवास करताना आम्हालाच खासदार असून सुरक्षित वाटत नाही तर सामान्य महिलांचे काय? महिलांवर आत्यचार झाले तर मातृभूमीच्या डोळ्यात देखील अश्रू येतात. महिला म्हणून जन्माला येणं हीच मोठी जबाबदारी आहे. सोनिया गांधींनी आपल्याला आरक्षण दिले. मात्र 50 टक्क्यांसाठी आपण भांडतो. त्यांच्यामुळे आज आमच्यासारख्या महिला पुढे आल्या, असे म्हणत पुढची निवडणूक जयश्री थोरात यांनी लढावी, अशी मागणीच प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.