Prashant Khaire : नगर : कोरोना (Corona) साथीच्या काळात जीवन हे किती क्षणभंगुर आहे, हे आपण अनुभवले आहे. दुसऱ्याने आपल्यासाठी काय केले, त्यापेक्षा आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी काय करतो याला महत्त्व आहे. प्रत्येकाने निष्काम कर्म करण्याची सवय लावल्यास मोठे आत्मिक समाधान मिळेल, असे प्रतिपादन अप्पर पोलीस (Police) अधीक्षक प्रशांत खैरे (Prashant Khaire) यांनी केले.
नक्की वाचा : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने; परभणी घटनेचा केला निषेध
महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन
महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे पोलीस मुख्यालयावर आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षरोपण राबविण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अध्यक्षस्थानी होते. राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, प्रशासकिय अधिकारी जी. पी. सोनवणे, प्रभारी तालुका समादेशक अधिकारी बी.आर. हरवणे, केंद्र नायक भीवा चौधरी, संजय शिवदे, भारत आत्रे, अण्णा पारदे, संतोष शिंदे, दिलीप भोसले आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : शहरातील ९० हजार मालमत्तांवर लावले ‘क्यूआर कोड’; अहिल्यानगर महापालिकेचा उपक्रम
खैरे म्हणाले की, (Prashant Khaire)
पोलीस दलातील महत्त्वाचा केंद्रबिंदू होमगार्ड असून, मुंबईत अतिरेक्यांनी २६ / ११ मध्ये झालेल्या हल्ल्यात होमगार्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. होमगार्ड संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून आपणही आपला आहार, आरोग्यासाठी नेहमी जागृत राहावे. व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. आपल्या प्रगतीसाठी दररोज सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. रक्तदान शिबिऱ्यातून गरजू रुग्णांना मोठी मदत मिळेल. जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून २५ होमगार्ड तसेच महिला होमगार्ड यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अण्णा पारधे, दिलीप भोसले, संतोष शिंदे यांनी परिश्रम घेतले. बी. आर. हरवणे यांनी आभार मानले.