Prashant Koratkar : शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक

Prashant Koratkar : शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटकc

0
Prashant Koratkar : शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक
Prashant Koratkar : शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक

Prashant Koratkar : अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या, व इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) तेलंगणातून अटक झाल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की वाचा : नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर

इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर कोरटकर होता फरार

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या घटनेनंतर इंद्रजित सावंत याने कॉल रेकॉर्डिंगमधील आवाज आपल्या नसल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे तो माध्यमांसमोर आपण निर्दोष असल्याचे सांगितले होते.

Prashant Koratkar : शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक
Prashant Koratkar : शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक

अवश्य वाचा : ‘मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं’-अजित पवार

अटक करून कोल्हापूरमध्ये आणले जाणार (Prashant Koratkar)

काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरचा दुबईतील फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे कोरटकर दुबईत पळून गेल्याची चर्चा होती. परंतु,नागपूरमधून फरार झालेल्या कोरटकरच्या पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळल्या आहेत. प्रशांत कोरटकरला सुरुवातीला कोर्टाकडून अटकपूर्व जमीन मिळाला होता. कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात पुन्हा कोरटकरच्या अटकेची मागणी केली होती. कोरटकरने आपला मोबाईल पोलिसांकडे सोपवला होता. परंतु, मोबाईलमधील संपूर्ण डेटा डिलीट केला होता. यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. पण तोपर्यंत प्रशांत कोरटकर फरार झाला होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके स्थापन करून शोध सुरु ठेवला होता. पण तो काही केल्या सापडत नव्हता. अखेर त्याला अटक करून कोल्हापूरमध्ये आणले जाणार आहे.