Pratibimb Film Festival : नगर : न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये (New Arts, Commerce and Science College) रविवारी (दि. 15) 19व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचे (Pratibimb Film Festival) शानदार उद्घाटन झाले. ‘युद्ध की शांतता’ या विषयावरील चित्रपट (Film) आणि ‘नैसर्गिक आपत्ती’ या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन 18 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
अवश्य वाचा- तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे : डॉ संजय नगरकर

फीत कापून चित्रपट महोत्सव आणि छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे यांच्या हस्ते फीत कापून चित्रपट महोत्सव आणि छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. माजी विद्यार्थी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, दिग्दर्शक मंगेश बदर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, महोत्सव संयोजक तथा संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी वृंद व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा- इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर …, अनिल कपूर आणि हरभजन सिंहने कुणाला दिला इशारा

कलाकारांशी गप्पांचा विशेष कार्यक्रम (Pratibimb Film Festival)
‘युद्ध की शांतता’ ही थीम असलेल्या या महोत्सवात ‘ऑल क्वाएट ऑन दि वेस्टर्न फ्रंट’ हा उद्घाटनाचा चित्रपट आणि त्यानंतर ‘फ्लो’ हा ॲनिमेशनपट दाखविण्यात आला. ‘न्यू आर्ट्स-डीसीएस’चे माजी विद्यार्थी मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि नगरच्या मातीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे अभिनित ‘मदार’ या चित्रपटाचा खास प्रदर्शनपूर्व शो खास नगरकरांसाठी दाखविण्यात आला. ‘कान’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेल्या या चित्रपटाला पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाच पुरस्कार मिळाले आहेत. नंतर मंगेश बदर आणि कलाकारांशी गप्पांचा विशेष कार्यक्रम रंगला.



