Pravara River : संगमनेर : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू असल्याने प्रवरा नदीला (Pravara River) पूर आला आहे. ओझर बुद्रुक व ओझर खुर्दला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. तर श्री जगदंबा माता (जगुबाई) मंदिराला पाण्याने वेढले आहे. वाघापूर गावातही पाणी शिरल्याने गावातील अनेक घरे आणि शेती पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे.
नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे
प्रवरा नदी व म्हाळुंगी नदीला पूर
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदी व म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. ओझर बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात पाणी वाहत आहे. प्रवरा नदीपात्रात वाहत असलेल्या पाण्यामुळे ओझर बुद्रुक व ओझर खुर्दला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. धांदरफळ खुर्द आणि बुद्रुकला जोडणारा पूल, संगमनेर खुर्द येथील पूल पाण्याखाली गेला आहे.
अवश्य वाचा: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका
अनेक घरांमध्ये पाणी शिरले (Pravara River)
तालुक्यातील वाघापूर गावात नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक शेतांमध्ये पाणी गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर संगमनेर अकोले मार्गावर कोकणेवाडी येथे मुख्य रस्त्यावरच पुराचे पाणी आल्याने अकोल्याकडे जाणारी रहदारी थांबविण्यात आली आहे. धरण क्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.