Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत

Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत

0
Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत
Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत

Praveen Rishiji Maharaj : नगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज (Anand Rishiji Maharaj) यांचे परम शिष्य उपाध्याय प्रवर प्रवीणऋषी महाराज (Praveen Rishiji Maharaj) यांचे रविवारी (ता. २४) सकाळी अहिल्यानगर शहरात आगमन झाल्यावर गुरु आनंद चतुर्मास समिती, अहिल्यानगर सकल श्रावक संघ, अनंत तीर्थ अर्हम विज्जा तसेच भाविकांनी त्यांचे भक्तिभावाने स्वागत केले. यानिमित्त आनंदऋषी हॉस्पिटल ते आनंदधाम (Anand Dham) पर्यंत भक्तिपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली.

Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत
Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत

अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा

महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी

जय आनंद जय आनंद…, जय कारा गुरुदेव का जय जय गुरुदेव…, कोण आये भाई कोण आये जैन धर्म के वीर आये…, महात्मा पुरुषों की सदाकार जय हो विजय हो… अशा जयजयकाराच्या घोषणा यावेळी उपस्थित नागारीक शोभायात्रेत देत होते. यामध्ये मंगल कलश घेतलेल्या महिला व जैन समजाचा ध्वज घेतलेले पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.शोभायात्रे दरम्यान प्रवीणऋषी महाराज यांचे भाविक ठिकठिकाणी दर्शन घेत स्वागत करत होते. आनंदधाम येथे महाराजांचे आगमन झाल्यावर महिला मंडळांनी टाळ्यांच्या गजरात भजन म्हणत महाराजांच्या भवती गोल रिंगण करून जयजयकारात स्वागत केले. त्यानंतर प्रवीण ऋषी महाराजांनी आनंदऋषी महाराजांच्या समाधी व स्मृतीस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. आनंदधाम येथील सभागृहात उपस्थित भाविकांना प्रवीणऋषी महाराजांनी प्रवचनातून संदेश देत मार्गदर्शन केले.

Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत
Praveen Rishiji Maharaj : अहिल्यानगरीत उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांचे स्वागत

नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार

प्रवीणऋषीजींचा चातुर्मास अहिल्यानगरमध्ये (Praveen Rishiji Maharaj)

यावेळी सिद्धेशऋषी महाराज, साध्वी विश्वदर्शना, सत्यप्रभाजी, अमितज्योती आदींसह साधुसंत व हजारो भाविक उपस्थित होते. अशोक बोरा म्हणाले, पूजनीय प्रवीणऋषी महाराजांचे अहिल्यानगरमध्ये आगमन झाल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात ऐतिहासिक ठरलेला चातुर्मासाची सांगता करून त्यांनी अहिल्यानगरमार्गे विहार करून त्यांनी सर्वांवर कृपा केली आहे. आता प्रवीणऋषी महाराजांचा २०२६ चा चातुर्मास अहिल्यानगरमध्ये होणार आहे. नगरचा चातुर्मास ही आपल्याला ऐतिहासिक करायचा आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. तर सर्व जैन समाजांच्या नागरिकांना या कार्यात जोडायचे आहे. यावेळी  अनिल पोखरणा, विलास कटारीया, राजू बोरा, सुरेश कटारिया, अशोक पितळे, आदेश  चंगेडिया, संजय चोपडा, विजय पितळे, शैलेश मुनोत, डॉ. अभय मुथा, डॉ. प्रकाश कांकरिया, राजेश भंडारी, संदीप देसर्डा, संदीप गांधी, अनिल कटारिया, राजमल चंगेडिया, पोपटलाल कटारिया, जितू मुनोत आदींसह  महिला सदस्या उपस्थित होत्या.