Preeti Sudan:प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

१९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

0
Preeti Sudan:प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Preeti Sudan:प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Preeti Sudan : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने आपल्या नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी (UPSC Chairperson) नियुक्ती करण्यात आली आहे. यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते. १ ऑगस्ट २०२४ रोजी प्रीती सुदान पदभार स्वीकारणार आहेत.

नक्की वाचा : मोठी बातमी ! यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

मनोज सोनी यांचा राजीनामा (Preeti Sudan)

मे २०२२ पासून या पदावर मनोज सोनी कार्यरत होते. यूपीएससी उमेदवारांनी निवडीसाठी बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्रे वापरल्याबद्दल वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी मनोज सोनी यांनी राजीनामा दिला.यामुळे आता त्यांच्या जागी प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ पर्यंत असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणाऱ्या यूपीएससीच्या अध्यक्षपदी संविधानाच्या कलम ३१६ च्या कलम (1A) अंतर्गत यूपीएससीच्या सदस्या प्रीती सुदान यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

हेही पहा : डेंग्यू व चिकनगुनियांची लक्षणे काय व काळजी कशी घ्याल ?

कोण आहेत प्रीती सुदान ? (Preeti Sudan)

प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरमधील १९८३ च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत मिशनमधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्या ओळखल्या जातात. याशिवाय नॅशनल मेडिकल कमिशन, अलाईड हेल्थ प्रोफेशनल कमिशन आणि ई-सिगारेटवर बंदी घालण्याचे श्रेयही त्यांना जाते. तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शनसाठी WHO च्या स्वतंत्र पॅनेलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here