President : राष्ट्रपतींच्या दाैऱ्याच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेरा छायाचित्रण करण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

0

President : नगर : राष्ट्रपती (President) द्राैपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या दाैऱ्याच्या अनुषंगाने नेवासेतील झापवाडी ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत असलेल्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहावी, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ३० नाेव्हेंबरपर्यंत ड्रोन कॅमेराद्वारे (Drone camera) छायाचित्रणाकरिता वापर करण्यास मनाई आदेश दिला आहे.

हे देखील वाचा: ..ती राजकीय चूक झाली, नाहीतर राज्यात भाजपची सत्ता आली नसती; माजी मुख्यमंत्र्यांची कबुली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने नेवासे तालुक्यातील झापवाडी शिवार येथील प्रमोद राधेश्याम खंडेलवाल आदी तीन जणांच्या शेतजमिनीवर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. हेलिपॅड परिसर त्याचप्रमाणे शनिशिंगणापूर मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी या परिसरात ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यासाठी मनाई आदेश जारी केले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी नुकतीच हेलिपॅड ठिकाणची पाहणी केली आहे.

नक्की वाचा: वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here