President : अकोले: अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणार्या शासकीय आश्रमशाळांतील (Government Ashram School) विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील एकूण 24 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांतून यशस्वी झालेल्या निवडक 24 विद्यार्थ्यांना राष्ट्रपती (President) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली आहे. या 24 विद्यार्थ्यांमध्ये राजूर प्रकल्पातील चार विद्यार्थ्यांचा समावेश होता.
नक्की वाचा : मोठी बातमी!अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही मुलांशी भेट
यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जवळे बाळेश्वर (ता.संगमनेर) या शाळेतील ऋतेज विलास डामसे (इयत्ता-नववी), विक्रम कांतीलाल पिचड (पिंपरकणे, ता.अकोले), उमेश विश्वनाथ वायाळ (केळी कोतूळ, ता.अकोले), ऋषीकेश पांडुरंग भांगरे (आदर्श आश्रमशाळा मवेशी, ता.अकोले) या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. 7 ते 11 डिसेंबरअखेर झालेल्या राष्ट्रपती भेटीच्या सहलीत केंद्रीय रस्ते व वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांचीही मुलांशी भेट झाली.
अवश्य वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू
मुलांनी दिल्लीतील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या (President)
सदर सहलीत मुलांनी दिल्लीतील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. जाताना रेल्वेने प्रवास तर येताना दिल्ली ते नाशिक विमान प्रवासाचा अद्भुत अनुभव मुलांनी घेतला. निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, सहायक प्रकल्प अधिकारी मनोज पैठणकर, दीपक कालेकर यांनी कौतुक केले. जवळे बाळेश्वर येथील विद्यार्थ्याचे शाळेच्यावतीने मुख्याध्यापक आदिनाथ सुतार, वर्गशिक्षक देविदास रणमाळे, अधीक्षक दीपक गुंडेकर, अधीक्षिका सुरेखा नाईकवाडी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी बुधवारी जोरदार स्वागत केले. यावेळी सरपंच बंटी पांडे, उपसरपंच अतुल कौटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल डामसे, उपाध्यक्षा सुनीता करवंदे, उपसरपंच अतुल कौटे, सोमनाथ करवंदे, पांडुरंग कौटे, रामदास भांगले, भाऊसाहेब कौटे, बन्सी चिखले, बाळू कौटे, शिंगाडे सर उपस्थित होते. तसेच यशस्वी विद्यार्थांना शिक्षक श्रीनिवास सूर्यवंशी, श्रीगणेश पवार, सुरेखा गायकवाड, नितीन पायके, दिलीप धांडोरे, संजय सुपे, संतोष गायकर, अश्विनी शिंदे, कल्पना सुकटे, गणेश खतोडे, विजय लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.