President Draupadi Murmu : नगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) हे नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येणार आहे. मुर्मू यांच्या संभाव्य दौऱ्यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली जबाबदारी (Responsibility) काटेकोरपणे पार पाडावी. दौऱ्याच्या सुरक्षा व्यवस्थेत ब्लू बुकमधील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
नक्की वाचा : हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी
मुर्मू यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित हाेते.
हे देखील वाचा : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रमण्यम स्वामींची तक्रार; गृहमंत्र्यांना धाडले पत्र
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, ”राष्ट्रपती थांबणार आहेत, त्या विश्रामगृह तसेच भेट देणार असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. राष्ट्रपती ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत, त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यात यावे. संपूर्ण दौऱ्यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. रस्त्यावरील सर्व विद्युत तारांची तपासणी करण्यात यावी. अद्ययावत आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्यात यावे. दौऱ्यादरम्यान कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच या काळामध्ये कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने विनापरवानगी मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.