Womens Day : महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची महिलांना मोठी भेट

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर १०० रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

0
Womens Day
Womens Day

नगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर (Gas Cylinder) १०० रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी आज सोशल मिडीयावर पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.

नक्की वाचा : ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ चा टिझर प्रदर्शित  

महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट (Womens Day)

यासंदर्भात पीएम मोदींनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, ‘आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल, असं यामध्ये सांगण्यात आले.

अवश्य वाचा : राजस्थान रॉयल्स आयपीएल साठी सज्ज;नवी जर्सी रिलीज   

दिल्लीत गॅस सिलिंडर फक्त ६०३ रुपयांना मिळणार (Womens Day)

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना २०२४-२५ या वर्षातही प्रति सिलिंडर ३०० रुपये अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. सुमारे १० लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना वर्षभरात १२ सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये आहे. परंतु योजनेअंतर्गत ६०३ रुपयांना सिलिंडर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी सरकारने रक्षाबंधनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली होती. पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना सिलेंडरचा भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा देशातील ३३ कोटी ग्राहकांना होणार आहे.

हेही पहा : मैत्रीचा अर्थ सांगणारे ‘कन्नी`मधील ‘यारा रे’ गाणे प्रदर्शित  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here