PM Modi Pune Visit:मोठी बातमी!पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

0
PM Modi Pune Visit:मोठी बातमी!पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द
PM Modi Pune Visit:मोठी बातमी!पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit cancelled) करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र पुण्यातील मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधानांचा दौरा करण्यात आलाय. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या या दौऱ्याची नवीन तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.  

नक्की वाचा : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज

पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने मोदी यांचा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit)

राज्यात परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द झाला आहे. येत्या काही तासांमध्ये पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची विशाल सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र,कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच पडेल. त्यामुळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी!मनोज जरांगेचं उपोषण स्थगित  

विधानसभेसाठी मोदींचा दौरा महत्वाचा  (PM Modi Pune Visit)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता.महायुती आणि भाजपला या दौऱ्याच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहचायचे होते.पर्यायी जागा शोधून छोटा कार्यक्रम करण्यात काहीही अर्थ नाही,अशा प्रकारचे मत समोर आले आले. तसेच दुपारी मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे. खराब वातावरणामुळे पंतप्रधानांच्या विमानाच्या लँडिंगला देखील अडथळा येऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here