Principal : नगर : जिल्ह्यात शेकडो शाळा मुख्याध्यापकांविना (Schools without Principals) चालत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक (Principal) पदावर कोणतीही पदोन्नती न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) सामाजिक न्याय विभागाचे नगर तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पंचमुख यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना निवेदन देऊन तातडीने पदोन्नतीची मागणी केली.
नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!
विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षकांकडे वर्ग सांभाळून मुख्याध्यापकांचा अतिरिक्त कार्यभार दिला जातो. यामुळे शिक्षकांवर दुहेरी ताण पडत आहे. अध्यापनाची गुणवत्ता कमी होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी
विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील आंदोलनाचा इशारा (Principal)
गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच होईल, असा दावा शिक्षण विभागाने वारंवार केला होता. मात्र, प्रत्यक्षात अद्याप नियुक्ती झालेली नाही. दरवेळी तालुकास्तरावरून माहिती मागवली जाते, याद्या प्रसिद्ध केल्या जातात, तरीही मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीचा विषय रखडलेला आहे. शिक्षक दिन पर्यंत मुख्याध्यापक पदाच्या रिक्त जागांवर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.