नगर : आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांना आपण अनेक चित्रपटात पाहिले आहे. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळालीय. आता स्टार प्रवाहच्या (Star Pravah) ‘काजळमाया’ मालिकेतून (Kajalmaya Serial) कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत.
नक्की वाचा: पाकिस्तान पुन्हा पहलगामसारखा हल्ला करू शकतो;भारतीय वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा
प्रिया बेर्डे साकारणार चेटकिणीची भूमिका (Priya Berde)
चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनक दत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. कनक दत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल.
अवश्य वाचा: पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक
काजळमाया मालिका २७ ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर (Priya Berde)
कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या,’माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अश्या पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनक दत्ताला पाहता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. अनेक कंगोरे आहेत या भूमिकेला. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. ही नवीन काजळमाया मालिका २७ ऑक्टोबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.