Rice and Pulses: देशातील ७० कोटी जनतेला दिलासा मिळणार;तांदळासह डाळींचं उत्पादन वाढणार

खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यानं डाळी आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय.

0
Rice and Pulses: देशातील ७० कोटी जनतेला दिलासा मिळणार;तांदळासह डाळींचं उत्पादन वाढणार
Rice and Pulses: देशातील ७० कोटी जनतेला दिलासा मिळणार;तांदळासह डाळींचं उत्पादन वाढणार

Rice and Pulses : शेतकऱ्यांसह (Farmers) देशातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण नागरिकांना आता महागाईपासून दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यानं डाळी (Dal) आणि तांदळाच्या (Rice) उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय. त्यामुळं येत्या काही महिन्यांत सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) चिंता करावी लागणार नाही.

नक्की वाचा : ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’;शरद पवारांचे सूचक विधान

डाळ आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज (Rice and Pulses)

डाळी आणि तांदळाचं उत्पादन वाढलं तर किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे देशातील ७० कोटी जनतेला दिलासा मिळणार आहे. मागील वर्षी तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली होती. देशाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून सरकारने निर्यातीवरही बंदी घातली होती. अशीच स्थिती डाळींमध्ये दिसून आली. आता मात्र, डाळ आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. देशातील सुमारे ७० कोटी म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तांदळावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भाताच्या उत्पादनात झालेली वाढ ही अशा लोकांसाठी गुडन्यूज आहे.

अवश्य वाचा : पुढील २४ तास महत्वाचे;हवामान विभागाकडून पावसाचा “रेड अलर्ट” जारी

भाताचे क्षेत्र १६६.०६ लाख हेक्टरपर्यंत वाढले (Rice and Pulses)


मान्सूनच्या चांगल्या पावसामुळे चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात आतापर्यंत ७ टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर भाताचे क्षेत्र १६६.०६ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी १९ जुलैपर्यंत १५५.६५ लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली होती. याचा अर्थ येत्या काही महिन्यांत तांदळाचे उत्पादन वाढल्याने भावावर लक्षणीय परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार नाही. भारताच्या १४० कोटी लोकसंख्येपैकी ७० कोटी म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक लोक तांदळावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत  देशात तांदळाचे उत्पादन वाढले तर सर्वसामान्यांना कमी दरात तांदूळ उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here